सत्यशोधक नजरेमुळे परमपूज्य भाऊंनी अठरा वर्षं साधनेत आणि नंतरची बारा वर्षं मनावर सखोल संशोधन केलं. नामातील चैतन्याचं संशोधन हा या संशोधनातीलच एक महत्त्वाचा भाग होय. त्यातूनच नाम हे ब्रह्मत्रयीनी युक्त असावं असा निष्कर्ष निघाला. परमपूज्य भाऊंनी स्वत: संस्कारित करून भावपूर्ण गायलेली ही अनेक सुप्त तालातील व व्यक्त तालातील विविध दैवतांची नामं आपलं मन निर्विचार आणि प्रसन्न करून सुयोग्य फलित निश्चितच पदरात टाकतात.

नामं